Friday 5 February 2016

5 FEB 1936 BABA MAHARAJ SATARKAR 

5th February 1936 Nilkanth Gyaneshwar Gore - Satarkar (Baba Maharaj Satarkar) Was Born

Baba Maharaj In Fields


Baba Maharaj Cricket

Baba Maharaj -Hunter

Baba Maharaj-Lawyer

Baba Maharaj Kirtankar



व्यक्तिमत्व
पुत्र, पिता, पती, बंधु, सखा, मित्र, सदगुरु या सर्वच भुमिका, आपल्या जीवनात महाराज अगदी सहज लीलया 
पेलत असतात. परिवाराला फडाला, समाजाला त्यांच्या प्रेमाने बाधुन ठेवले आहे. कीर्तनकलेचा परिपूर्ण अविष्कार
 म्हणजे बाबामहराज हे खरेच आहे. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेकही अनोखे पैलू आहेत. 
बालपणी त्यांना घोडेसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वात अभ्यासाबरोबरच रस होता. 
फोटोग्राफी त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसर, अनोख्या रचनांची त्यांची आवड, लाकूड, दगड, चित्रे, इमारती 
आणि प्रसंगी जुळीतही उठुन दिसते.

एक अत्यंत उत्कृष्ट गायक एक महान कीर्तनकार, एक कसलेला शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, वारकरी विश्वाची बाजू समर्थपणे मांडणारा स्वयंभू पदवी असलेला वकील शब्दाच्या खेळाने तथा कोटीने मजा उडवून देत अंर्तमुख 
करणयास लावणारा एक कोटयाधीश, फडावरील सकळा आधार देणारा समर्थ सदगुरु, समाजाला देवदत्त 
स्वर्गिय सुस्वरां च्या स्वशक्तिपाताने सन्मार्गा नेणारा महामानव, परिवारातील स्वजनांना आपली थोरीव 
विसरुन आपला जिवलग, सखा वाटणारा मायबाप अशा अनेकविध पैलूनीं प्रकाशणारे महाराजांचे व्यक्तिमत्व 
बहु आयामी आहे.

निर्सग, प्राणी, माणसे, कला, संगीत, भजनकीर्तन, परमेश्वर, जीवनावर भरभरुन मनस्वी प्रेम करणारे कलंदर 
दिलखुलास, गंगेच्या जलासम पावन आणि पारदर्शी तरीही अति परखड, समर्थ, राजस, लोभस असे त्यांचे
 व्यक्तिमत्व सर्वांना खिळवून ठेवते, हे मात्र वास्तव सत्य आहे.
परिवार जीवन
श्री सदगुरु दादा महाराजांचे सर्वात धाकटे चिरंजीव ज्ञानेश्वर तथा भाऊ महाराज आणि लक्ष्मीबाई या भाग्यवंत
 पिता आणि माता यांचे उदरीं कौसल्या तथा माईंचा जन्म दिनांक १ आक्टोंबर १९३४ ला झाला. सुपुत्र निळकंठ 
म्हणजे आपल्या सर्वांचे माय बाबा महाराज. त्यांचा जन्म सातारा येथे दिनांक ५ फेब्रुवारी १९३६ साली झाला. 
माघ शुध्द त्रयोदशी शके १८१८ हा दिवस बाबा महाराजांच्या जन्मांमुळे अविस्मरणीय ठरला. अनंत जन्माच्या 
पुण्याईने माता लक्ष्मीबाई आणि पिता ज्ञानेश्वर यांच्या उदरी महान भगवदभक्त बाबा महाराज जन्मला आले. 
त्यानीं आपल्या कर्तृत्वाने सातारकर कुळाला अधिक उज्वल केले.
श्री सदगुरु दादा महाराजांचे सर्वात धाकटे चिरंजीव ज्ञानेश्वर तथा भाऊ महाराज आणि लक्ष्मीबाई या भाग्यवंत
 पिता आणि माता यांचे उदरीं कौसल्या तथा माईंचा जन्म दिनांक १ आक्टोंबर १९३४ ला झाला. सुपुत्र निळकंठ
 म्हणजे आपल्या सर्वांचे माय बाबा महाराज. त्यांचा जन्म सातारा येथे दिनांक ५ फेब्रुवारी १९३६ साली झाला.
 माघ शुध्द त्रयोदशी शके १८१८ हा दिवस बाबा महाराजांच्या जन्मांमुळे अविस्मरणीय ठरला. अनंत जन्माच्या
 पुण्याईने माता लक्ष्मीबाई आणि पिता ज्ञानेश्वर यांच्या उदरी महान भगवदभक्त बाबा महाराज जन्मला आले.
 त्यानीं आपल्या कर्तृत्वाने सातारकर कुळाला अधिक उज्वल केले.
२४ मार्च सन १९५४ साली देशमुख दिंडीचे वीणेकरी श्री पांडुरंग जाधव यांच्या सुलक्षणी नात दुर्गा हिने एका
गोरज मुहूर्तावर सकलसौभाग्यसंपन्न रुक्मिणी बनून महाराजांच्या जीवनात लक्ष्मीच्या पाऊलांनीं पदार्पण
 केले. त्यांच्या संसारवेलीवर सम १९५८ ला भगवती, १९६२ ला रासेश्वरी, सन १९६३ ला चैतन्य अशी फुले
ऊमलली. एक भाग्यशाली संसार विश्वकल्याणार्थ अवतीर्ण झाला.
श्री चैतन्य महाराज,सातारकर संत परंपरेतील एक छोटीशी कळी। न उमलता
अकस्मात माऊलींच्या चरणीं गळून पडली. त्याना ज्ञानेश्वरीचे चार
अध्याय पाठ होते. लहानपणापासुनच महाराजांचे मागे कीर्तनांत ऊत्कृष्ट
लयबध्द टाळ वाजवित असत. वारीच्या वाटेने दिंडीत असले की सर्व
टाळकरी मंडळी एकदम खूष असत. त्यांच्या नाचण्यातही बाबा
महाराजांसारखा डौल होता. महाराजांच्या कीर्तनात माईक सारखा
करता करता ते माईकरुपच झाले. चैतन्य जसा त्यांचा आत्मा होता,
तसेच त्यांच्या कार्यक्रमाचा ‘‘ माईक व आवाज ’’ हा आत्माच होय. म्हणूनच
त्यांना माईक सिस्टिम कीर्तनासाठी ऊत्तम लागते. मला वाटते,
त्यांच्यासमोर माईक नसून चैतन्यच उभा असतो व ते त्याच्या
माध्यमातून बोलत असतात.

महाराजांच्या जीवनात, दुधात साखर विरघाळावी तशा समरस झालेल्या
त्यांच्या कांता सौ. रुक्मिणी यासुध्दा सर्वांच्या आईसाहेब बनून
गेल्या.सावलीसारखी महाराजांच्या कार्यात सदैव सोबत राहून जी सेवा,
सहकार्य करीत आहेत ते खरोखरच अद्भूत असे कार्य आहे.

पन्नास वर्षांच्या अपूर्व आनंदाच्या संसारपूर्ति नंतर परत दोघांच्या
विवाहासोहळ्याचे भाग्यदेखील महाराजांचे पदरी घालून देवाने स्वताःलाच
धन्य मानले असावे.
 


सदगुरु दादा महाराज यांचे तर या नातवावर विलक्षण प्रेम. त्यांचा प्रेमबोध बाबामहाराजांच्या रुपानेच भविष्यात
 समाजाला सदैव लाभतच राहिला आहे. आणि ही भाग्यशाली अजोबा- नातवाची प्रेमजोडी परत एकदा आजोबा
 बाबामहाराज आणि नातु चिन्मय महाराजच्या रुपाने परावर्तित झाली
.महाराजांच्या सा-या अलौकिक जीवनाचा सोनेरी कलश, तथा परिपूर्णता म्हणजे या सर्वाबरोबरच महाराजांच्या
 मोठया भगिनी कौसल्या याही अविवाहित राहून या परिवाराच्या विश्वकल्याणकार्यांत मोठया बहिणीची
 भुमिका निभावत, आजही सदैव निशब्द सक्रीय समर्थ साथच करीत असतात. माई आणि महाराज ही जोड 
आजही चिन्मय आणि दर्शनी रुपे परावर्तित झाल्यासारखी आज तरी वाटत आहे.

सर्वच नात्यांच्या अलौकिक प्रेमाचे दर्शन म्हणजेच बाबामहाराजांचे जीवन हेच खरे वास्तव होय
समाजकार्य - व्यसनमुक्त समाज
महाराजांनी आपल्या रोजच्या कीर्तनात आणि कीर्तनानंतर अथवा प्रवचनातून केलेल्या उपदेशाच्या,
आवाहनाच्या सादेला प्रतिसाद देत लाखो लोक त्यांच्या हातून पंढरीच्या पांडुरंगाची पवित्र तुळशीमाळ
आपल्या गळ्यात धारण करत आहेत.रोजच्या कीर्तनानंतर तो एक कीर्तनाइतकाच महत्वाचा कार्यक्रम
ठरत आहे.कारण त्या माळेच्या पवित्र बंधनामुळे व्यसन सोडून चांगले जीवन जगण्याचा पक्का निश्चय
करण्यास गुरुकृपेने मन दृढ राहते.परिणाम संपूर्ण कुटूंबच सात्विक जीवन जगु लागते.
तुलसीमाला धारण करताना नंतर पाळावयाचे नियम महाराज लिखीत स्वरुपात देतात,ते असेः-
तुळशीची माळ घालुन गुरुमुखाद्वारे ‘ जय जय रामकृष्णहरी ’ मंत्र घेणे हाच गुरु अनुग्रह होय. घातलेली
 तुळशीमाळ कधीही काढू नये. माळ घातल्यानंतर आपण वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ अशा सातारकर
परंपरेशी निगडीत झालो ही खूणगाठ बांधावी. त्या परंपरेतून वर्षभर जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना
 हजर राहावे आणि विशेष म्हणजे प्रतिवर्षी श्री क्षेत्र दुधिवरे येथे २६ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी जो
सप्ताह होतो त्या सप्ताहास उपस्थित राहावे.
मानसपूजा
सकाळी उठल्याबरोबर प्रथम आराध्य दैवत श्रीपांडुरंग व श्री संताची मानसपूजा करावी. देवाला व
संतांना पंचामृताने स्नान घालून अंग पुसून उत्तम कपडे घालावेत, नंतर मस्तकाला व चरणाला गंध-
बुक्का लावावा. गळ्यामध्ये तुळशीचा हार घालावा व फुले वाहावीत. आरती करावी व नैवेद्य दाखवून
 प्रसाद सेवन करावा. विडा देऊन तांबुल प्राशन करावे व मस्तक ठेवून प्रार्थना करावी की, “मायबापा,
मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा.”
  • स्नान झाल्यानंतर देवपूजा करुन ‘जय जय रामकृष्णहरी ’ नावाची एक जपमाळ जपावी. 
  • रामकृष्णहरी हा बीजमंत्र आहे, त्याच्या नित्य जपाने व पठनाने उपासना फलद्रूप होते.
  • श्री जगद्गुरु तुकोबाराया आपल्या एका अभंगात म्हणतात,
    रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ।।
    याहूनि आणीक नाहीं पैं साधन । वाहातसें आण विठोबाची ।।
  • तर श्री ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात,
    रामकृष्णनामे ही दोन्ही साजिरी । हृदयमंदिरीं स्मरा का रे ।।
  • जप झाल्यानंतर श्री ज्ञानेश्वरीचे एक पान तरी नित्यनेमाने वाचावे व वारकरी संप्रदायाच्या 
  • परंपरेतील इतर संताच्या वाड.मयाचेही आळीपाळीने पारायण करावे.( श्री तुकाराम महाराजांचा 
  • गाथा, श्री नामदेव महाराजांचा गाथा, श्री एकनाथ महाराजांचे भागवत, भावार्थ रामायण व 
  • श्री निवृत्तीनाथ, श्री सोपानकाका, श्री मुक्ताबाई व निळोबारायांचे अभंग वाड.मयापर्यंत.)
  • संध्याकाळी आपली नोकरी अथवा व्यवसाय आटोपल्यानंतर देवाला व संतांना उदबत्ती ओवाळून 
  • प्रथम पंचपदी ‘भजनीमालिके’ तील पाच अभंग म्हणावेत व नंतर हरिपाठ म्हणावा. रात्री 
  • श्री पांडुरंगाला, श्री संतांना वंदन करुन प्रभुचे नामस्मरण करत झोपी जावे, ही वारकरी संप्रायाची 
  • दिनचर्या होय.
  • वारकरी संप्रदायाची तुळशीमाळ घातलेल्यानीं मांस-मच्छी, गुटखा खाऊ नये, दारु पिऊ नये, 
  • जुगार खेळू नये. पुरुष असेल तर परस्त्री रुक्मिणीमातेसमान व स्त्री असेल परपुरुष 
  • श्री पांडुरंगासमान मानावा.
  • घातलेली माळ कधीही काढू नये. माळ गळ्यात असल्याशिवाय अन्नग्रहण करु नये. माळ तुटली अथवा 
  • खराब झाल्यास दुसरी घालावी पण एकदा घातल्यावर ती काढू नये.
    पण पंधरा दिवसाचे एकादशीला ( शुध्द,वद्य) उपवास करावा. हरिकीतर्नाला जावे.
  • वर्षातून एक वारी पंढरीची, एक वारी संत ज्ञानेश्वर माऊलीची व श्री तुकाराम महाराजांची करावी. ज्यांना 
  • भरपूर सवड मिळेल त्यांनीं आषाढी वारी श्री माऊलीचे पालखीबरोबर श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर
  •  पर्यंत दरवर्षी करावी. ज्यांना सवड कमी असेल त्यांनी जिथे जमेल तिथे दिंडीत सामील व्हावे, ज्यानां 
  • अगदी कमी सवड असेल त्यानीं आषाढ शुध्द दशमीला पंढरीत यावे व कमीतकमी व्दादशी अथवा 
  • पौर्णिमेच्या काल्यापर्यंत राहावे. कार्तिक वद्यामध्ये सर्वानीं श्री ज्ञानेश्वर माऊलीची आळंदी वारी व 
  • त्या वारीला जोडूनच श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांची देहूची वारी करावी. निदान आषाढी 
  • वारीचे वेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पंढरपूरला यावे.
समावेशकता
या रे या रे लहानथोर, याति भलते नारी नर अशी संतवचनाची साद घालत महाराज संतांनी दिलेल्या या
सकळासी अधिकार असणा-या नामभक्तिप्रेमाच्या आनंदात सर्वानांच आपल्या देवदत्त स्वर्गीय सुर
स्वरसामार्थ्याने सदगुरुकृपेने न्हाऊ घालतात. यामध्ये सामान्य भाविक वारकरी स्त्रीपुरुष तर
असतातच, पण त्यांचेबरोबर समाजकारणी, राजकारणी तसेच थोर थोर महात्म्ये महासाधुसंतही आहेत.
सामान्य भोळा भाबडा वारकरी तर महाराजांचे जणु काय आराध्य दैवतच.
 
सिध्द महाराज
महराजांचे ठायी सौंदर्यसिध्दी, स्वरसिध्दी, सुरसिध्दी,
समाजसिध्दी, सरस्वतीसिध्दी, स्त्रीसिध्दी, श्रीसिध्दी,
सदगुरुसिध्दी या अष्टमहासिध्दी एकवटलेल्या आसल्याने ते
एक महान सिध्द महाराज तथा अवतारी संतसदगुरु आहेत
म्हणूनच गावी वाटते त्यांची आरती.

आरती सदगुरु बाबा । ओवाळीते सदभावा।
आरती सदगुरु बाबा

तुम्ही भक्त भागवत । केले अवघ्या जना व्यसनमुक्त।।
आरती सदगुरु बाबा

तुम्ही दावुनी देवाचे स्वरुप । सुख दुःख त्याचीच रुप।।
आरती सदगुरु बाबा

तुम्ही देवुनी आधार । फुलिविले सकलांचे जीवन।।
आरती सदगुरु बाबा

करुनी आरती झाले जीवन कृतार्थ । माईचे पुरले मनोरथ।।
आरती सदगुरु बाबा
 
पुरस्कार प्राप्तीपुरस्कारामुळें महाराज की महाराजांमुळें पुरस्कार विशोभित हे कळू शकत नाही ,एवढे पुरस्कार त्यांनां जीवनभर मिळत रहिले, मिळत राहत आहेत, मिळत राहणार आहेत. या पुरस्कारांमध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट,तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे, पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत.
पुरस्कारामुळें महाराज की महाराजांमुळें पुरस्कार विशोभित हे कळू शकत नाही ,एवढे पुरस्कार त्यांनां जीवनभर मिळत रहिले, मिळत राहत आहेत, मिळत राहणार आहेत. या पुरस्कारांमध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट,तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे, पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत.
पांडुरंगाची पगडी आणि अंगरखा देवून बडवे मंडळी तर्फे बाबाम्हाराजांचा गौरव
गिरगाव, फलटण, सातारा ह्या सर्व भूषणपुरस्कार त्यांच्या आयुष्यात दोन पुरस्कार अत्यंत महत्वाचे, एक पंढरीत श्री पांडुरंगाची पगडी, आणि आळंदीत श्री ज्ञानेश्वर माऊलीची मेखला घालून मिळालेले पुरस्कार देवसंतांचा प्राप्त झालेला महान आशीर्वादच आहे.
गिरगाव, फलटण, सातारा ह्या सर्व भूषणपुरस्कार त्यांच्या आयुष्यात दोन पुरस्कार अत्यंत महत्वाचे, एक पंढरीत श्री पांडुरंगाची पगडी, आणि आळंदीत श्री ज्ञानेश्वर माऊलीची मेखला घालून मिळालेले पुरस्कार देवसंतांचा प्राप्त झालेला महान आशीर्वादच आहे.
बाबा महाराज सातारकर यांना सातारकर फडातर्फे
मंत्र मंदिराची चांदीची प्रतिकृती भेट
समग्र भाविकांची दृढ श्रध्दा आणि प्रेमाने सदगुरुपदपुरस्कार लाभलेल्या महाराजांना आता कोणत्या अन्य पुरस्काराने गौरविता येईल बरे ।
काय द्यावे यासी व्हावे उतराई । ठेविता हा पायीं जीव थोडा ।।
 
चातुर्मास प्रवचने
महाराजांची प्रत्येक वर्षात चातृमासाची तथा श्रावण महिन्याची अनुष्ठाने होत असतात.प्रथमतः झालेली मुंबईची प्रवचने लोकात भावभक्तिश्रध्दा वर्धित करणारी ठरली.
मुंबई
मुंबई येथे चार धाम मंदिर तथा तुकाराम महाराज मंदिर सदगुरू दादा महाराज सातारकर वाडी गिरगाव; फडके गणपती मंदिर,गिरगाव आणि काळाराम मंदिर ठाकूरद्वार येथे १९८० ते १९९८ आशी सलग १८ वर्ष संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली काळाराम मंदिर ठाकूर द्वार येथे अमृतानुभव चांगदेवपासाष्टी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या निवडक अभंगावर निरुपण केले.
पुणे
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट यांचे वतीने गेली पंचवीस वर्षे चातुर्मास प्रवचने . प्रवचन विषय -- श्री गणपती, श्रीएकनाथी रामायण, कृष्णाचरित्र, श्रीज्ञानेश्वरी ९ वा आणि १२ वा अध्याय. अमृतानुभव .
सम

महाराजच्या रुपाने परावर्तित झाली.

 अजोबा आणि नातु बाबा महाराज 

 अजोबा आणि नातु चिन्मय 

 परिवार 
२४ मार्च सन १९५४ साली देशच्या संसारवेलीवर सम १९५८ ला भगवती, 
आईसाहेब

पन्नास 

त्रिवेणी

जलासम पावन आणि पारदर्शी तरीही अति परखड, समर्थ, राजस, लोभस असे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना खिळवून ठेवते, हे मात्र वास्तव सत्य आहे.




About 4,290 results (0.32 seconds) 
    Stay up to date on results for baba maharaj satarkar.
    Create alert
    About 57,500 results (0.66 seconds) 

    1. Baba Maharaj Satarkar - Bollywood, Rock, Classical & more‎

      Adwww.amazon.in/baba+maharaj+satarkar
      1 Day Delivery Available. Buy Now!
    Kharghar, Navi Mumbai, Maharashtra - From your Internet address - Use precise location
     - Learn more   





    No comments:

    Post a Comment