21-23 APR 2017 97 AKHILBHARTIYA MARATHI NATYA SAMMELAN
उस्मानाबाद-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या यजमानपदाची संधी उस्मानाबादला मिळाली आहे. याबाबत परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी घोषणा केली असून दि.७ ते एप्रिल दरम्यान हे नाट्य संमेलन उस्मानाबादेत पार पडणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून नाट्य संमेलनासाठी उत्सुक असलेल्या उस्मानाबादकरांना लवकरच स्वप्नपूर्तीचा आनंद मिळणार आहे.
नाट्य परिषदेचे यजमानपद उस्मानाबाद शाखेला मिळावे यासाठी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे यापूर्वीच रीतसर मागणी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, दिलीप कोरके, दीपक वेलंकर यांनी दि.१९ जानेवारी रोजी उस्मानाबादला भेट देऊन संमेलनाच्या नियोजित स्थळांची पाहणी केली. संमेलनासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेऊन निवास, भोजन आदी व्यवस्थांबाबत स्थानिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला. यावेळी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, रवींद्र केसकर, राजेंद्र अत्रे, माजी नगराध्यक्ष संपत डोके, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख, महेश पोतदार, मोतीचंद बेदमुथा, नगरसेवक अक्षय ढोबळे, उदय निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंगाडे, संतोष हंबीरे, विशाल सोनटक्के, तानाजी जाधवर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, प्रा. भालचंद्र हुच्चे, प्रा. गजानन गवळी, उद्योजक आशीष मोदाणी, प्रशांत कुदाळ, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज भोसले आदी मान्यवरांशी चर्चा केली.
यावेळी जोशी यांनी नाट्यसंमेलनाच्या यजमान पदाबाबत मुंबई येथे नाट्य मंडळाच्या संयोजन समितीबरोबर चर्चा करून उस्मानाबादकरांना सकारात्मक निर्णय कळवू असेही सांगितले होते. त्यानंतर नाट्य परिषदेच्या शनिवारी झालेल्या चर्चेत नाट्य संमेलन उस्मानाबादला घेण्याबाबत एकमत होऊन याबाबतची अधिकृत घोषणा प्रमुख कार्यवाह करंजीकर यांनी केली. नियोजित संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हे नाट्य संमेलन दि.७ ते एप्रिल दरम्यान उस्मानाबादेत होणार आहे. यामुळे उस्मानाबादकरही या अपूर्व सोहळ्याला अविस्मरणीय करण्यासाठी तयारीला लागले असून या निर्णयाचे नाट्यक्षेत्रासह साहित्यवर्तुळातूनही स्वागत होत आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर यांची निवड
रंगभूमीवर सहा दशके वावरताना समोरच्या रसिकांना त्या भूमिकेत गुंतवून ठेवण्याची किमया सावरकरांकडे आहे.
लोकसत्ता ऑनलाइन | Updated: November 14, 2016 4:32 PM
जयंत सावरकर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना’च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड करण्यात झाली आहे. आज मुंबईत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत विचारविनिमय होऊन संमेलनाध्यक्ष म्हणून जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जयंत सावरकर यांच्यासह अशोक समेळ, प्रविण कुलकर्णी, बापु लिमये, प्रशांत दळवी (सर्व मुंबई), श्रीनिवास भणगे (पुणे), विनायक केळकर (सांगली) यांचे प्रस्ताव दाखल झाले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते. ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते. सध्या अभिनेते मोहन जोशी हे संमेलनाध्यक्ष आहेत.
रंगभूमीवर आपले अस्तित्व उजळून टाकण्यासाठी कायिक, वाचिक अभिनयाबरोबरच अनेक गुणांची उधळण करीत अभिनेता किंवा अभिनेत्री आपले सारे आयुष्य पणाला लावत असतात, हे खरे. परंतु रंगमंचावर पदार्पण करताच दाद मिळणाऱ्या सहकलाकारांचे मोल त्यामुळे अजिबातच कमी होत नाही. आपल्या छोटय़ाशा भूमिकेतही सगळ्यांच्या नजरांचा ठहराव मिळवणे, ही काही सोपी गोष्ट नव्हे. जयंत सावरकर हे अशाच काही नटांपैकी एक. रंगभूमीवर सहा दशके वावरताना समोरच्या रसिकांना त्या भूमिकेत गुंतवून ठेवण्याची किमया सावरकर यांच्याकडे आहे. त्यांच्या रंगमंचीय कारकिर्दीची चुणूक त्यांच्या मोठय़ा भूमिकांतून जशी दिसते, तशीच त्यांनी केलेल्या छोटय़ा भूमिकांतूनही. कलावंत नाटक संपल्यानंतरही लक्षात राहणे, ही खरी पावती. ती सावरकर यांना अनेकदा मिळाली आहे.
विजया मेहता, दामू केंकरे यांच्यासारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना रंगभूमीवर वावरता आले आणि ‘लिटिल थिएटर’ या सुधा करमरकर यांच्या बालनाटय़ चळवळीतही ते काम करू शकले. आजही रंगभूमीवरील कलाकारांसाठी दंतकथा बनून राहिलेल्या केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना मिळाले. पण ते ज्या काळात रंगभूमीवर वावरले, त्यातील सगळ्या बदलांचे ते सक्रिय साक्षीदार राहिले आहेत. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी आणि मंगेश कदम यांच्या दिग्दर्शनाखालीही सावरकर रंगमंचावर अवतरले. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, व्यक्ती आणि वल्ली, तुझे आहे तुजपाशी, ययाति आणि देवयानी, एकच प्याला अशा विविधरंगी नाटकांमधून जयंत सावरकर अतिशय आत्मविश्वासाने वावरले.
First Published on November 14, 2016 4:24 pm
Web Title: Jayant Sawarkar Elected As President For 97th Akhil Bhartiy Marathi Natya Sammelan
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
From Wikipedia, the free encyclopedia
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (All India Marathi Literary Conference) is an annual conference for literary discussions by Marathi writers. Marathi is the first language of majority of people from Maharashtra state. The first Marathi Sahitya Sammelan was held in Pune in 1878 under the chairmanship of Justice Mahadev Govind Ranade.
Contents
[hide]Conferences held[edit]
Women presidents[edit]
Only four women have been the presidents of the Sammelan to date:
Year | Location | President |
---|---|---|
1961 | Gwalior | Kusumavati Deshpande[6] |
1975 | Karad | Durga Bhagwat[6] |
1996 | Alandi | Shanta Shelke[6] |
2001 | Indore | Vijaya Rajadhyaksha[6] |
No comments:
Post a Comment